Breaking

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

*जगातील श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क अव्वल ; पहिल्या पाचमध्ये अमेरिकेचा दबदबा*


 जगातील पाच श्रीमंत व्यक्ती


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


न्यूयॉर्क : ब्लूमबर्गच्या अब्जाधीश निर्देशांकानुसार १६ सप्टेंबर २०२६ रोजी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपतींचे वर्चस्व दिसून आले. या यादीत एलॉन मस्क यांनी अव्वल स्थान कायम राखले असून, त्यांच्यानंतर गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन आणि डेल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक मायकल डेल यांचा समावेश असून हे पाच ही श्रीमंत व्यक्ती या अमेरिकन नागरिक आहेत.

      ब्लूमबर्ग निर्देशांकातील उपलब्ध आकडेवारीनुसार:

1)एलॉन मस्क – सुमारे ८९२ अब्ज डॉलर

2)लॅरी पेज – सुमारे २९५ अब्ज डॉलर

3)जेफ बेझोस – सुमारे २७४ अब्ज डॉलर

4)सर्गेई ब्रिन – सुमारे २६६ अब्ज डॉलर

5)मायकल डेल – सुमारे २४५ अब्ज डॉलर

    या क्रमवारीत टेस्ला, स्पेसएक्स, अल्फाबेट, ॲमेझॉन आणि डेल यांसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांशी संबंधित उद्योगपतींचा समावेश आहे. शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे या अब्जाधीशांच्या संपत्तीच्या अंदाजात दररोज बदल होत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा