![]() |
| सेट परीक्षेच्या तारखेत बदल |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
पुणे : महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) २०२६ च्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारी ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) आता रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक आणि २५ सप्टेंबर रोजी असलेली अनंत चतुर्दशी यामुळे परीक्षार्थींना प्रवास व परीक्षा केंद्रावर पोहोचताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती.
या पार्श्वभूमीवर परीक्षार्थींकडून प्राप्त निवेदनांचा विचार करून परीक्षा आयोजनाच्या दृष्टीने तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २७ सप्टेंबरची परीक्षा रद्द करून २५ ऑक्टोबर २०२६ रोजी SET परीक्षा घेण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SET भवन, गणेशखिंड, पुणे येथून दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शुद्धीपत्रक अधिसूचनेद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. सर्व परीक्षार्थी, परीक्षा संपर्क प्रमुख आणि संबंधित यंत्रणांनी सुधारित तारखेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा