![]() |
| ४६ व्या युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य प्रकार सादर करताना |
वैयक्तिक स्पर्धेचा सर्वसाधारण फिरता चषक शहाजी लॉ कॉलेजकडे; १५ कला प्रकारांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जयसिंगपूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६ विविध सांस्कृतिक कला प्रकारांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाने जल्लोषात संपन्न झाला. एकदिवसीय या महोत्सवात १५ कला प्रकारांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. रात्री उशिरा विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले.
सांघिक स्पर्धेचा सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरने पटकावला, तर वैयक्तिक स्पर्धेचा सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूरने मिळविला.
मराठी वक्तृत्व स्पर्धेत शहाजी लॉ कॉलेज प्रथम, कमला कॉलेज द्वितीय, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तृतीय, द न्यू कॉलेज चौथे तर शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी. एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज पाचवे राहिले.
हिंदी वक्तृत्वमध्ये शहाजी लॉ कॉलेज प्रथम, विवेकानंद कॉलेज द्वितीय, डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज तृतीय, जयवंत महाविद्यालय, इचलकरंजी चौथे व डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पाचवे राहिले.
इंग्रजी वक्तृत्वमध्ये शहाजी लॉ कॉलेज प्रथम, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग द्वितीय, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तृतीय, द न्यू कॉलेज चौथे तर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, गडहिंग्लज पाचवे राहिले.
वादविवाद स्पर्धेत श्री व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी प्रथम, शहाजी लॉ कॉलेज द्वितीय, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तृतीय, सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ चौथे आणि जयसिंगपूर कॉलेज पाचवे राहिले.
प्रश्नमंजुषेत विवेकानंद कॉलेज प्रथम, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग द्वितीय, शहाजी लॉ कॉलेज तृतीय, सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ चौथे आणि डॉ. घाळी कॉलेज पाचवे राहिले.
सुगम गायन स्पर्धेत शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी. एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज प्रथम, साधना कॉलेज ऑफ कॉमर्स द्वितीय, आर. बी. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड तृतीय, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चौथे आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स पाचवे राहिले.
भारतीय समूहगीत स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम, सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ द्वितीय, शहाजी लॉ कॉलेज तृतीय, द न्यू कॉलेज चौथे आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स पाचवे राहिले.
एकपात्री अभिनयात शहाजी लॉ कॉलेज प्रथम, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स द्वितीय, विवेकानंद कॉलेज तृतीय, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चौथे आणि द न्यू कॉलेज पाचवे राहिले.
पथनाट्य स्पर्धेत सर्व अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ प्रथम, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग द्वितीय, विवेकानंद कॉलेज तृतीय, शहाजी लॉ कॉलेज चौथे आणि कर्मवीर हिरे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अँड एज्युकेशन कॉलेज, गारगोटी पाचवे राहिले.
मूकनाट्य स्पर्धेत डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे प्रथम, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड द्वितीय, विवेकानंद कॉलेज तृतीय, जयसिंगपूर कॉलेज चौथे आणि भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पाचवे राहिले.
प्रहसिका स्पर्धेत राजाराम कॉलेज प्रथम, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग द्वितीय, द न्यू कॉलेज तृतीय, महावीर महाविद्यालय चौथे आणि विवेकानंद कॉलेज पाचवे राहिले.
एकांकिका स्पर्धेत द न्यू कॉलेज प्रथम, विवेकानंद कॉलेज द्वितीय, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स तृतीय, दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी चौथे आणि शहाजी लॉ कॉलेज पाचवे राहिले.
लोककला स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम, श्री व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी द्वितीय, डी. आर. माने आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कागल तृतीय, श्री शहाजी छत्रपती कॉलेज चौथे आणि द न्यू कॉलेज पाचवे राहिले.
लोकनृत्य स्पर्धेत दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी प्रथम, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी द्वितीय, सर्व अधिविभाग शिवाजी विद्यापीठ तृतीय, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चौथे आणि दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी पाचवे राहिले.
अभिव्यक्ती, नेतृत्वगुण, संघभावना आणि सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या या महोत्सवात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या युवा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.आर.के.कामत, प्र.कुलगुरू प्रा.डॉ. जे.पी.जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे प्र. संचालक डॉ. एस. जी. घाणे, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव समितीचे सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.आर.एच.अतिग्रे, अधिक्षक सुरेखा टी आडके मॅडम, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील, सर्व पदाधिकारी, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप तापकीर, स्थानिक युवा महोत्सव समिती अधीक्षक संजय चावरे व अन्य घटकांच्यामुळे हा युवा महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा