Breaking

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६

समान काम-समान वेतनासाठी जयसिंगपूर न्यायालयातील कर्मचारी एकवटले; काळ्या फिती लावून निषेध

 

Ai निर्मित फोटो 


 शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन; न्यायालयीन कर्मचाऱ्यांची समान वेतनाची मागणी


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : समान काम-समान वेतनाच्या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. समान कामासाठी समान मोबदला मिळावा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

        कोल्हापूर जिल्हा समान काम-समान वेतन आंदोलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांना समान कामाचा समान मोबदला मिळावा, यासाठी विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने जयसिंगपूर न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

         न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनातील समानतेचा प्रश्न मार्गी लागावा आणि समान कामासाठी समान वेतनाची मागणी मान्य व्हावी, यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

   या आंदोलनात अधीक्षक संभाजी भोसले, नंदकिशोर गजगेश्वर, सतीश गुरव, रफिक पखाली, तेजश्री देवल, सुनीता मोरे-गिरमल, शोभा आजाटे, श्रेया सरदेसाई, शिवानंद करवडे, गणेश जोशी, भरत चव्हाण, तुषार पवार, प्रतीक इंगवले, विद्यासागर कोळी, राहुल माने, सिद्राम कांबळे, संदीप काजवे यांच्यासह न्यायालयातील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा