![]() |
| मार्गदर्शन करताना डॉ. मिलिंद काळे, मा. अजय शिंदे, कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कुलसचिव डॉ. संजय कवडे, संचालक डॉ. सोमी नाथ खाडे व अन्य मान्यवर |
डॉ. काळे पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. तसेच देशाला सक्षम बनविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे विचार नमूद केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. विजय फुलारी म्हणाले, युवक महोत्सवाच्या माध्यमातून विविध संस्कृती, कला आणि विचारांचे आदान-प्रदान होते. विद्यार्थ्यांना विविध सामाजिक अनुभव मिळतात, त्यांच्या क्षमतांमध्ये वाढ होते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होऊन आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
याप्रसंगी अजय शिंदे क्षत्रिय (संचालक, पुणे), कुलसचिव डॉ. संजय कवडे, प्रा. रमेश देवकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोमिनाथ खाडे, संचालक डॉ. शितल सोळंके, संचालक डॉ. सुशील शिंदे, डॉ. निलेश कडू तसेच विविध विद्यापीठांचे संघनायक आणि सुमारे ३५० विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.
प्रारंभी संचालक डॉ. सोमीनाथ खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अनंत कणगरे यांनी आभार मानले, तर डॉ. सचिन कळलावे यांनी सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा