Breaking

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६

*शिस्त, जिद्द आणि अथक परिश्रमांतून विकसित भारत शक्य : कुलगुरू डॉ. विजय फुलारी*


 उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विजय फुलारी,, डॉ. अजय शिंदे, डॉ. मिलिंद काळे, कुलसचिव डॉ. संजय कवडे व डॉ. सोमीनाथ खाडे व अन्य मान्यवर

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम राबविणारी संघटना नसून, जबाबदार नागरिक आणि समाजाभिमुख नेतृत्व घडविणारे प्रभावी व्यासपीठ आहे. त्यामुळे युवकांनी व्यसनमुक्त समाजनिर्मिती, सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी केले.शिस्त, जिद्द आणि अथक परिश्रमांतून विकसित भारत शक्य असल्याबाबत मत प्रतिपादित केले.

     ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन पूर्व निवड चाचणी शिबीर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

        याप्रसंगी अजय शिंदे, क्षत्रिय संचालक, पुणे, डॉ.मिलिंद काळे राज्य संपर्क अधिकारी महाराष्ट्र शासन ,कुलसचिव डॉ. संजय कवडे, प्रा. रमेश देवकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोमीनाथ खाडे,संचालक डॉ. शितल सोळंके, संचालक  डॉ. सुशील शिंदे व विविध विद्यापीठाचे संघनायक व 350 स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

      यावेळी डॉ. सोमीनाथ खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.आभार डॉ. डॉ. अनंत कणगरे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन कळलावे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा