Breaking

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६

*​शिरोळ येथे 'रोटरी कडून महिलांना 'नवदुर्गा पुरस्कार' प्रदान*


 रोटरी कडून महिलांचा सन्मान 

प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक 


​शिरोळ :  रोटरी क्लब ऑफ शिरोळ आणि डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिला दांडिया २०२६'  कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ कर्तबगार महिलांना 'नवदुर्गा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. ​हा कार्यक्रम गुरुवारी,  टारे क्लब हाऊस, शिरोळ येथे अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला.  

        ​​यावेळी समाजातील विविध स्तरांवर प्रेरणादायी कार्य करणाऱ्या पुढील महिलांना 'नवदुर्गा पुरस्कार' प्रदान करण्यात आला: 

नगराध्यक्षा योगिता सतिश कांबळे,  कल्पना प्रवीण माळी,जयश्री जगदीश पाटील,​मनिषा नितीन कुंभार,​ पौर्णिमा महेश चुडमुंगे, अश्विनी चंद्रसेन इंगवले ,अनुराधा संतोष माने, प्रज्ञा श्रीकांत माळकर, लता मदन माने  यांचा सन्मान करण्यात आला.

        ​​या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, सानिका आवाडे - यड्रावकर, अविनाश टारे , पंडीत काळ, डॉ.अंगराज माने,मोहनराव माने,रोटरी क्लबचे  अध्यक्ष रोटे. दिनेश माने-गावडे, नितीन शेट्टी, सचिन देशमुख, संदीप बावचे, शिवराज महात्मे ,बाळासो शेट्टी, अतुल टारे , प्रताप देसाई , सुनिल बागडी , विजय माळी , अमित पंडीत, बापूसो गंगधर यांच्यासह क्लबचे  सदस्य व महिला   उपस्थित होते.  

       ​महिलांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा