Breaking

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२६

*आरपीआय युवा आघाडीच्या नियुक्त्या जाहीर ; जयसिंगपूर-शिरोळमध्ये संघटन मजबुतीवर भर*

 

 नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्र प्रदान करताना 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने मुख्य संपादक*


जयसिंगपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवा आघाडी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जयसिंगपूर व शिरोळ शहरातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जयसिंगपूर येथील दिनबंधू हौसिंग सोसायटी सभागृहात करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष अविनाश दादा शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

      जयसिंगपूर शहर सचिवपदी शामराव देसाई, संपर्क प्रमुखपदी निलेश कांबळे, कार्याध्यक्षपदी विजय शिंदे, शाखाध्यक्षपदी चेतन कोलप, उपाध्यक्षपदी बबन शिकलगार आणि शाखा सचिवपदी सुरज पाटील यांची नियुक्ती झाली. शिरोळ शहर सचिवपदी विजय वायदंडे, तर संघटकपदी जकवान मोमीन यांची निवड करण्यात आली.

        यावेळी अविनाश शिंदे यांनी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना सक्षम बनविणे आणि युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे, हे युवा आघाडीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

         कोल्हापूर शहराध्यक्ष किरण निकाळजे यांनी युवा आघाडीच्या नेतृत्वाचे कौतुक करून संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

       यावेळी सचिन कांबळे, उमेश मोरे, रोहित काळे, सुरज कांबळे, अभिजीत कांबळे, चारू कांबळे, निरज कांबळे, अर्जुन भोरे, गणेश साठे, शेखर मादर, प्रदीप आयगोळे, सुभाष खाडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा