Breaking

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

*जैनापूरच्या पाणीप्रश्नासाठी अनिल पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन*


 जैनापुरात पाण्यासाठी आमरण उपोषण 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


जैनापूर  : गावातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी २० ऑक्टोबर २०२६ पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. जैनापूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवून नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

      पिण्याचे शुद्ध पाणी हा नागरिकांच्या आरोग्याशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    गावातील पाणीप्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण ग्रामस्थांच्या हिताचा विषय आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

    अनिल पाटील यांच्या अन्नत्याग उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन काय भूमिका घेते आणि जैनापूरच्या पाणीप्रश्नावर कधी ठोस निर्णय होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा