![]() |
| पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने माजी प्रशासन आधिकारी मेघन देसाई, डॉ. सुभाष अडदंडे,डॉ. महावीर अक्कोळे व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवनियुक्त विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण विभागाचे माजी प्रशासन अधिकारी मेघन देसाई होते.
देसाई यांनी विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, शिस्त आणि कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा राबवत असलेल्या रचनात्मक उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी प्रा. बी. ए. पाटील व प्रा. महेश शिंगे यांनी निवड प्रक्रियेतील अनुभव सांगितले, तर मुख्याध्यापक बाळकृष्ण पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली.
विद्यार्थी परिषदेच्या हेड गर्लपदी स्वरा पाटील, हेड बॉयपदी वेद बागे, सेक्रेटरीपदी अवनीश बिदनूरकर व अवनी अडदंडे, कल्चरल हेडपदी नंदिनी चौगुले व आलोक चौगुले, तर स्पोर्ट्स कॅप्टनपदी दीक्षा जिरगाळे व गौरेश खोत यांची निवड झाली. विविध हाऊस कॅप्टन व व्हाईस कॅप्टन यांचीही नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, सविता अडदंडे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, डॉ. वैशाली पाटील, उपस्थित होते.
शाळेचे मॅनेजर अभिजीत अडदंडे, शिस्तपालन समिती प्रमुख शिल्पा अडदंडे, प्री प्रायमरी प्रमुख रश्मी सांगले, शाळा समन्वयक कल्याणी अक्कोळे यांचा सक्रिय सहभाग होता.
पाहुण्यांचा परिचय प्रीती पाटील, सूत्रसंचालन निर्मला चव्हाण यांनी केले, तर आभार रेश्मा बेभान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा