Breaking

रविवार, १६ मे, २०२१

तौकते चक्रीवादळाची दाहकता वाढली : वाऱ्याचा वेग 200 किमी प्रति तास पेक्षा जास्त होण्याचा हवामान विभागाचा अंदाज




 प्रमुख प्रतिनिधी: प्रा.अक्षय माने

     जस जसे तौकते चक्रीवादळ समुद्रात गोव्याकडून गुजरात कडे सरकत आहे तसा त्याचा वेग वाढत असून कर्नाटक, केरळ आणि गोव्या मध्ये किनारपट्टी भागात या वादळाने भरपूर हाहाकार माजवला आहे. प्रचंड वारा आणि मुसळधार पावसामुळे किनारपट्टी भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, आणि मुंबई मध्ये हवामान विभागाने रेड आणि ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे तसेच अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई मधील कोविड पेशंट ना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे तसेच लसीकरण देखील थांबवले आहे.

गोव्यात वादळी वाऱ्यामुळे 500 हून अधिक वृक्ष उन्मळून पडले असुन घरांचेही नुकसान झाले आहे.


     आज सकाळपासूनच कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून समुद्र प्रचंड खवळला आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर मध्ये किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

 चक्रीवादळाचे उग्र रूप पाहता NDRF च्या तुकड्यांची संख्या आता 100 करण्यात आली आहे, ज्यामुळे वादळामुळे होणाऱ्या नुकसान आणि बचाव कार्यात मदत होईल.

या वादळाचा फटका रत्नागिरी , सिंधदुर्ग पासुन जवळ असलेल्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील बसण्याची शक्यता आहे. आज दिवसभर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यात वाऱ्यासोबत पावसाची संततधार सुरू आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा