Breaking

रविवार, १६ मे, २०२१

प्रथमच एम.फिल./पीएच.डी. ऑनलाइन प्रवेश परीक्षेचे प्रॉक्टरींग पद्धतीने यशस्वी आयोजन : परीक्षा संचालक श्री गजानन पळसे





परीक्षा  संचालक श्री गजानन पळसे


सौ. गीता माने/ सहसंपादक :

   कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होत असून एम.फिल./पीएच.डी. ऑनलाइन प्रवेश परीक्षेचे प्रथमच प्रॉक्टरींग पद्धतीने यशस्वीपणे आयोजित करण्यात आले होते.

       शिवाजी विद्यापीठात एम.फिल. व पीएच.डी. ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिनांक १४ व १५ मे २०२१ रोजी आयोजित केली होती.दि.१४ मे रोजी अकाउंटन्सी, बिझनेस इकॉनॉमिक्स व कॉमर्स - एमबीए बेस्ड या विषयांच्या व दि.१५ मे रोजी एज्युकेशन, बिझनेस मॅनेजमेंट- एम बी ए बेस्ड, केमिकल इंजिनीअरिंग, फार्मसी, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, फिजिकल एज्युकेशन,मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, सिव्हिल, इंजिनिअरिंग, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स,Nano सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग, झूलॉजी, होम सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स,बिझनेस मॅनेजमेंट,एम.कॉम.बेस्ड, केमेस्ट्री,हिंदी, इंग्रजी, भूगोल,मराठी, इलेक्ट्रॉनिक्स, इंजीनियरिंग,अग्रो केमिकल अँड बेस्ट मॅनेजमेंट, बायोकेमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, हिस्टरी,इत्यादी विषयांच्या परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पडल्या.

      सदर परीक्षेसाठी दोन्ही दिवशी एकूण ४१० विद्यार्थ्यांपैकी ३१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी प्रथमच सुरू केलेल्या प्रॉक्टरींग पद्धतीबाबत चांगली प्रतिक्रिया दिली आहे तसेच  परीक्षा विभागाचे मनस्वी आभार व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा