शाजापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी एका अल्पवयीन दुकानदाराला जोरानं कानाखाली मारताना दिसत आहेत. कर्फ्यूदरम्यान नियमांचं उल्लंघन केलेल्या दुकानदारावर नियमानुसार कारवाई न करता मंजूषा विक्रांत यांनी आपल्याकडील अधिकारांचा गैरवापर करत त्याला थेट कानाखाली मारली.
भोपाळ 24 मे: छत्तीसगडच्या सूरजपूरमधील जिल्हाधिकाऱ्यानं रस्त्यावरच एका तरुणाचा मोबाईल फोडत त्याला चापट मारली होती. हे प्रकरण ताज असतानाच अशीच आणखी एक घटना आता मध्य प्रदेशमधून समोर आली आहे. यात शाजापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी एका दुकानदाराला जोरानं चापट मारताना दिसत आहेत. कर्फ्यूदरम्यान नियमांचं उल्लंघन केलेल्या दुकानदारावर नियमानुसार कारवाई न करता मंजूषा विक्रांत यांनी आपल्याकडील अधिकारांचा गैरवापर करत त्याला थेट चापट मारली.
कोरोना कर्फ्यूदरम्यान या दुकानदारानं आपला दुकान उघडलं. मात्र, प्रशासनाची टीम याठिकाणी दाखल होताच त्यानं आपल्या बचावासाठी सांगितलं, की दुकानाच्या आतमध्येच माझं घर आहे. टीमनं आतामध्ये जाऊन पाहणी केली असता तो खोटं बोलत असल्याचं समोर आलं. याच गोष्टीवरुन मंजूषा विक्रांत यांना राग अनावर झाला आणि त्यांनी अल्पवयीन मुलाला चापट मारली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करुन दुकान उघडणं चुकीचं आहेच. मात्र, त्यावर अशाप्रकारची कारवाई करणंदेखील चुकीचंच आहे.शाजापुर अपर कलेक्टर मंजूषा विक्रांत राय का थप्पड़ मारने का वीडियो वायरल,कोराना कर्फ़्यू के दौरान जूते की दुकान में मौजूद बच्चे को मारा थप्पड़, दुकान खोलने पर बरसा एडीएम का गुस्सा @ndtv @ndtvindia pic.twitter.com/n0K4jq0bSp
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) May 24, 2021
काहीच दिवसांपूर्वी अशीच एक घटना सूरजपूरमध्येही घडली होती. यात जिल्हाधिकाऱ्यांनी एका तरुणाला भररस्त्यात चापट मारली होती. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी संबंधित अधिकाऱ्याला पदावरुन काढून टाकलं होतं. आता या अधिकाऱ्याविरोधातही अशीच कडक कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुरजपुर मधील घटना
@PMOIndia@bhupeshbaghel#surajpurcollector
— VOICE OF TRUTH (@voiceof63102702) May 23, 2021
Disgraceful this is, immediate action should be taken on this. aise kaise koi kisi ka phone todd skta hai aur thappad mar skta hai 😑।
क्या कोई दवा भी नहीं लेने जा सकता। pic.twitter.com/7T4TyjHsTP
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा