Breaking

सोमवार, २४ मे, २०२१

"दादा मला वाचव - या दवाखान्यातून मला शिफ्ट कर" मृत्यूनंतर मिळाले कोरोना रुग्णाचे भावनिक साद घालणारे पत्र"

 

       कोरोना महामारीने देशातील सर्व जनता मेटाकुटीला आली असून  आर्थिक व मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेली आहे. संपूर्ण देशातील अर्थ चक्राचा वेग मंदावलेला असून लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

       कोव्हीड रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण म्हणून दाखल झालेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून  संबंधित कोव्हीड हॉस्पिटलच्या कोरोना रुग्णाच्या सेवेबद्दल, हॉस्पिटल प्रशासनाविषयी व बिलाच्या संदर्भात सर्वत्र उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.

       अशीच एक दुर्देवी घटना कोल्हापूर  मध्ये घडलेली आहे. एका मयत झालेल्या कोरोना रुग्णाकडून तेथील प्रशासन व्यवस्था व कोरोनाच्या नावाखाली दिली जाणारी वैद्यकीय सेवे विषयी आक्षेप/ तक्रार त्यांनी आपल्या पत्रात नोंदविला आहे. सध्या संबंधित कोरोना रुग्ण २ दिवसापूर्वी मयत झाला असून  ICU मध्ये ऑक्सीजन बेडवर असताना  तेथील व्यवस्था व वैद्यकीय सेवेविषयी स्वहस्ताक्षरात आपल्या मोठ्या भावाला भावनिक साद घालणारे पत्र लिहिले आहे.

      हे पत्र कोरोनाग्रस्त रुग्णाने थरथरत्या हाताने लिहिलेला असल्यामुळे ते अक्षर स्पष्ट दिसत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पत्र रुग्णाच्या भावाला मयत झाल्यानंतर त्याच्या फाईलमध्ये मिळून आले आहे. त्यामुळे तेथील रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय सेवेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

या पत्रामध्ये  "येथील ऑक्सिजन बेड व्यवस्थित नाहीयेत... जेवणाची आभाळ होतेय, त्यामुळे मला या रुग्णालयातून दुसरीकडे शिफ्ट करा. माझ्यासमवेत इतर रुग्णांचेही हेच हाल चालू आहेत." असा स्पष्ट मजकूर यात दिसत आहे.

हे आहे पत्र




 


      एकंदरीत वरील वायरल झालेल्या पत्रावरून वैद्यकीय सेवेविषयी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांकडून व इतर घटकाकडून या हॉस्पिटलविषयी प्रचंड मोठा रोष व्यक्त केला जात आहे.आता  त्या खाजगी रुग्णालयावर गुन्हा दाखल केला जातो का ? व केल्यास जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होते का? हे देखील महत्त्वाच आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे हे मान्य करावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा