Breaking

मंगळवार, २५ मे, २०२१

राज्यातल्या या जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद - कोविड सेंटर मध्येच घ्यावे लागतील उपचार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे

 



     राज्यातल्या कोरोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण (होम आयसोलेशन) संपूर्णपणे बंद कऱण्याचे आदेश  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. म्युकरमायकोसिस आणि कोरोना या दोन आजारांसंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, “जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण १०० टक्के बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.”


राज्यात सध्या बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, मुंबई, पुणे, ठाणे हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा