केंद्र सरकारच्या नवीन डिजिटल नियमांविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या नियमांना विरोध देखील होत आहे. दरम्यान, या नियमांच्या विरोधात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कोर्टात गेले आहे. व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांचा हवाला दिला आहे. आजपासून लागू होणाऱ्या नियमावलीविरोधात अॅपने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे नियम वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची सुरक्षा खंडित करण्यास भाग पाडतील, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.
"या नवीन नियमांनुसार व्हॉटसअप अँपवर विशिष्ट संदेश कोठून आला हे व्हॉट्सअॅपला सांगावे लागेल."
याबाबत व्हॉट्सअॅपने एक निवेदन दिले आहे. “गप्पांना ट्रेस करण्यास भाग पाडणारा हा कायदा व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर फिंगरप्रिंट ठेवण्यासारखा आहे. जर आपण हे केले तर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन निरर्थक होईल आणि लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे देखील उल्लंघन केले जाईल.”
व्हॉट्सअॅपने कोर्टाला विनंती केली की, नवीन नियमांना भारतीय घटनेतील गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे जाहीर करावे. कारण सोशल मीडिया कंपन्यांसमोर अशी अट ठेवण्यात आली आहे की, संबंधित अधिकाऱ्याने विचारले तर ‘फर्स्ट ओरिजिनेटर ऑफ इन्फॉर्मेशन’ म्हणजे प्रथम विशिष्ट संदेश कोणी पाठवला, हे शोधावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा