रोहित जाधव /शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
आर्थिक वर्ष २०१९-२० या गळीत हंगामातील गुरुदत्त शुगर्सकडे गाळपासाठी गेलेल्या उसाची फेब्रुवारी नंतरची ऊस बिले व काही शेतकऱ्यांचे ५६४ रुपयेप्रमाणे एफ.आर.पी. ची रक्कम अद्याप कारखान्याने शेतकऱ्यांना दिलेली नाही. शासन निर्णयानुसार १४ दिवसाच्या आत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कायदा आहे. पण त्या कायद्याला वाटाण्याच्या अक्षदा दाखवत गुरुदत्त शुगर्स कडून शेतकऱ्यांची १५ कोटी रुपयांची एफ आर पी दिलेली नसून ती थकित आहे कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ १५ टक्के व्याजासह ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. अन्यथा १ जून पासून कारखाना कार्यस्थळावर उपोषणाचे हत्यार उपसले जाईल असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.
टाकळीतील शेतकरी अरुण पाटील यांना सेवा संस्थेने वेळेत कर्जफेड न केल्याने नोटीस बजावली आहे. अशी वेळ शेतकऱ्यावर येण्याचं कारण म्हणजे साखर कारखान्याने ऊस बिल वेळेत न दिल्याने नवीन कर्ज मिळत नाही व जुने फिटत नाही आणि व्याजाचा भुर्दंड ही सोसावा लागत आहे याला जबाबदार साखर कारखाना आहे असे मत अरुण पाटील यांनी व्यक्त केले आहे. गुरुदत्त शुगर्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करू असे आश्वासन दिले. यावेळी गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, शेती अधिकारी जाधव, शेती विभाग प्रमुख घोरपडे यांचेसह आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे, टाकळी येथील दीपक पाटील,सुधीर पाटील, अरुण पाटील ,अकिवाट येथील पांडूसिंग रजपूत, दत्तवाड येथील ओंकार पाटील यांचेसह आंदोलन अंकुश या संघटनेचे मोजके सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा