Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

नवलच! या गावात चक्क कोरोना देवीचे मंदिर उभारले

 



 तामिळनाडू : दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यामध्येही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता आपल्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी देवच मदतीला येऊ शकतो असं येथील स्थानिकांना वाटत असल्याने शहराच्या बाहेर चक्क करोना देवीचं मंदिर उभारण्यात आलं आहे.


शहराच्या बाहेरील इरुगुरमधील कामत्विपुरी अधीनम नावाच्या मठाने या मंदिराची स्थापना केलीय. या मंदिरात करोना देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. अधीनमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवीची मूर्ती काळ्या खडकामधून साकारण्यात आली आहे. ही मूर्ती अडीच फूट उंचीची असून मठाच्या परिसरामधील मंदिरामध्येच तिची प्रतिष्ठापना कऱण्यात आलीय. रोज येथे अनेक भक्त या करोना देवची पुजा करण्यासाठी येत आहेत. करोनापासून मुक्ती मिळावी म्हणून या ठिकाणी ४८ दिवसांच्या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.

एकीकडे सारा देश कोरोनाशी विज्ञानाच्या आधारे लढत आहे आणि दुसरीकडे अशा या अतार्किक घटना घडत आहेत.


अशाप्रकारे यापूर्वीही येथे प्लेगच्या साथीच्या वेळेस मंदिराची स्थापना करुन त्याला प्लेग मरियम्मन मंदिर असं नाव देण्यात आलं होतं. प्लेगमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर उभारण्यात आलं आणि त्यात मरियम्मनची प्रतिमा ठेवण्यात आली होती. लोकांनी या देवाची आराधना सुरु केली आणि त्यानंतर काही कालावधीनंतर प्लेगच्या साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं येथील स्थानिकांनी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकल्याचं सांगतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा