Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

कोल्हापूर: सोमवारपासून लॉकडाऊन होणार शिथिल ?

 



कोल्हापूर: कोल्हापूर मध्ये सुरू असणारे कडक लॉकडाऊन रविवारी (ता.23) रात्री 12 पासून शिथिल होणार असे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. सोमवार (ता.24) पासून राज्य शासनाच्या नियम व पूर्वीच्या अटीनुसार लॉकडाऊन सुरू राहिल.असे संकेत मिळाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कडक लाॅकडाऊन ची अंमलबजावणी झाली.  रस्त्यावर फिरत होते त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला होता.दरम्यान हे लाॅकडाऊन वाढणार अशी अनेकांची शंका होती. मात्र रविवारी रात्रीपासून लाॅकडाऊन शिथिल करून सोमवारपासून राज्य शासनाच्या नियमानुसार व्यवहार सुरू राहतील असे संकेत मिळाले आहेत. कडक लाॅकडाऊन हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. तरीही हा कडक लाॅकडाऊन सर्वानी पाळला. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन एक हजार ते दीड हजार पर्यंत कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यू दरही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लॉकडाउन करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही, अशी भूमिका सर्वच आमदारांनी घेतली होती. त्यानंतर शनिवारी रात्री पासून खडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. मात्र सोमवारपासून राज्य शासनाच्या नियम आणि पूर्वीच्या अटीनुसार लॉकडाऊन सुरू राहिल असे संकेत मिळाले आहेत.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा