Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

"प्रा.डाॅ.एन.डी.पाटील यांची प्रकृती उत्तम"

 




           नमस्कार,समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष ,महाराष्ट्राचे थोर विचारवंत नेते आणि प्रबोधन चळवळीचे प्रेरणास्थान आदरणीय प्रा.डॉ.एन. डी. पाटील आणि आदरणीय सरोजताई उर्फ माई यांच्या लग्नाचा सोमवार ता.१७ मे २०२१ रोजी  एकसष्ठावा वाढदिवस झाला. जन्मजात लढवय्ये असलेले एन.डी.सर  वयाच्या त्र्याणव्व्या वर्षी कोरोनावर मात करून दवाखान्यातून १६ मे रोजी सुखरुप घरी परतले. 

         गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रकृतीविषयी चुकीची बातमी प्रसारीत केली गेली. काहींनी ती समाजमाध्यमांवरून व्हायरल केली. त्या बातमीमुळे  कुंटूबियांना व सर्व एन.डी.परिवाराला त्रास सहन करावा लागला. याबाबत tv 9 च्या संपादकांनी  दिलगिरी व्यक्त करणारी पोस्ट केली. तसेच मा.माईनीही त्यावर खुलासा केला व एन.डी.साहेबांचा वृत्तपत्र वाचतानाचा व्हिडिओही शेअर केला. तो आम्ही अनेकांनी व्हायरल केला. आणि या विषयावर पडदा पडला.

             पण पुन्हा आज शुक्रवार ता. २१ रोजी दुपारपासून परत तशाच प्रकारे समाजमाध्यमांवर चुकीची बातमी पसरवली आहे.लोकांनी कसलीही खात्री न करता ती फॉरवर्ड केली.काहींनी स्टेट्सलाही ठेवली. ही बाब अत्यंत खेदजनक व संतापदायक आहे. अशा उतावीळ व गांभीर्यहीन विकृतीचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे.अशांचा बंदोबस्त होणे  गरजेचे आहे.तरी कोणीही अशा खोट्या बातम्या फॉरवर्ड करू नयेत ही नम्र विनंती. आम्ही आत्ता रात्री ८ वाजता मा.माईंशी फोनवरून बोललो आहे.सरांची प्रकृती उत्तम आहे.तेंव्हा कोणीही काळजी करू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.


आपले विश्वासू,

 प्रसाद कुलकर्णी (समाजवादी प्रबोधिनी )

विक्रांत पाटील ( महाराष्ट राज्य इरिगेशन फेडरेशन )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा