Breaking

बुधवार, २६ मे, २०२१

W.C.R.S टीमकडून मगरीच्या सात पिल्लांना जीवदान; कोथळी हद्दीत सापडली पिल्ले.


 कोल्हापूर : वारणा व कृष्णा नदी काठावर मगरींचा वावर सतत पाहायला मिळतो. काल दि.25 मे रोजी कोथळी ( ता.शिरोळ) येथील वारणा नदीकाठावर असलेल्या निमगोंडा पाटील यांच्या वीटभट्टी वरील कामगारांना मगरीची काही पिल्ली दिसून आली. तेव्हा त्यांनी तात्काळ "वाइल्ड लाईफ कंझर्वेशन रेस्क्यू सोसायटी" (W.C.R.S) टीमला संपर्क साधला.

     काही वेळातच W.C.R.S टीमने तेथे पोहचून त्या पिल्लांना रेस्क्यू केले. अधिक पाहणी केली असता काही अंडी देखील मिळाली. एकूण 7 पिल्ले व 3 अंडी मिळाली.

      

WCRS टीम

     हातकणंगले विभागाचे वनपाल घनश्याम भोसले यांच्या परवानगीने W.C.R.S टीमने या पिल्लांना व अंड्यांना सुरक्षित स्थळी सोडले.

     यावेळी W.C.R.S टीमचे अध्यक्ष अभिजित खामकर व सहकारी शुभम रास्ते, साई रसाळ, शाहरुख मुजावर, सुमित धोत्रे, सचिन सुरपुरे इत्यादी उपस्थित होते.

     वन्यजीव बचावासाठी W.C.R.S टीम कायम दक्ष व उपस्थित असते. आजपर्यंत टीमने जवळपास 1200 सर्प व 16 मगरींना रेस्कु करून जीवदान दिले आहे. इतर वन्यजीव बचावासाठीही टीमचे सहकार्य वन विभागाला वेळोवेळी लाभत असते. सध्या टीमची धुरा अभिजित खामकर सांभाळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा