प्रा.अक्षय माने/ कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :
आज २०२१ या वर्षातील पहिले पूर्णाकृती चंद्रग्रहण असून आज जगभरात पूर्ण चंद्रग्रहणाचे दर्शन होणार आहे. तसेच आज चंद्र लाल रंगात न्हाऊन गेल्यासारखा दिसणार आहे. २ वर्षानंतर पहिल्यांदा असे पूर्णाकृती चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद खगोल प्रेमींना मिळणार आहे.
हे चंद्रग्रहण "सुपर ब्लड मून" म्हणून सुध्दा ओळखले जाणार आहे. कारण यावेळी चंद्र लाल- नारंगी रंगाचा दिसणार आहे.ज्यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राचा मध्ये सरळ रेषेत येते त्यावेळी पूर्ण चंद्रग्रहण दिसते.
हे पूर्ण चंद्रग्रहण जगातील पूर्व आशिया, पॅसिफिक, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागराच्या काही भागात पूर्ण चंद्रग्रहण दिसेल.
भारतात हे चंद्रग्रहण अंशतः दिसणार आहे. अंशतः चंद्र ग्रहण हे पूर्व भारत, नेपाल, पश्चिम चीन, मंगोलिया आणि पूर्व रशिया मध्ये दिसेल.
हे चंद्रग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २:१७ ला सुरू होऊन रात्री रात्री ७:१९ ला संपेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा