Breaking

बुधवार, १९ मे, २०२१

काय सांगता; हिरव्या रंगाचे बलक असणारे अंडे! काय आहे वैज्ञानिक कारण ? जाणून घ्या.




 मलप्पुरम, केरळ: केरळमधील एका विचित्र घटना घडल्याचे वृत्त मिळालं आहे ते म्हणजे मलप्पुरममधील एका छोट्या पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे सहा कोंबड्यांनी हिरव्या रंगाचे बलक असलेली अंडी घातली आहेत. ओथुककुंगल येथील मूळ रहिवासी असलेले ए.के शिहाबुधीन यांनी सोशल मीडियावर हिरव्या रंगाची अंडी असलेली अंडींचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.




वैज्ञानिक काय म्हणाले ?


केव्हीएएसयूच्या कुक्कुट विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ एस शंकरलिंगम म्हणाले की ही घटना कोणत्याही अनुवंशिक विकृतीमुळे घडलेली नाही.

"आमचा ठाम विश्वास आहे की, हे त्या पक्ष्यांना दिल्या जाणाऱ्या  आहारामुळे होते. 

  संशोधनासाठी नेलेल्या त्याच कोंबड्यानी विद्यापीठाने दिलेला साधा आहार दिल्यानंतर कोंबड्यांनी साध्या पिवळ्या रंगाचे बलक असणारे अंडे देण्यास सुरुवात केली. " प्राध्यापकांनी सांगितले की, कोंबड्यांच्या त्वचेखालील चरबीच्या साठ्यात हिरवा रंगद्रव्य आढळल्यानंतर त्यांनी हे निश्चित केले.

 

     “कोंबड्यांचे मालक  शिहाबुद्दीन यांनी सांगितले होते की, आम्ही कोंबड्यांना विशेष असा कोणताच खुराक देत नव्हतो.

     यावर वैज्ञानिक  शंकरलिंगम यांनी स्पष्ट केले की केरळमधील सामान्यतः कुरुंठोटी (सिडा कॉर्डिफोलिया - एक औषधी वनस्पती) नैसर्गिक वनस्पती चे सेवन केल्याने कोंबड्या अशा प्रकारे हिरवे बलक असलेली अंडी देऊ शकतात,”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा