![]() |
पालकमंत्री - सतेज पाटील |
कोल्हापूर: कोरोना पेशंटना सुरुवातीचे काही दिवस उपचार देवून व रुग्ण अत्यवस्थ झाल्यावर शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात पाठविण्याचा प्रताप काही खासगी रूग्णालये करत आहेत. आपल्या रुग्णायातील मृत्यूची संख्या कमी दाखविण्यासाठी सुरू असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता पालकमंत्री सतेज पाटीलच आक्रमक झाले आहेत. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यात गेले महिनाभर करोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज हजारावर रूग्ण आढळत आहेत. सरकारी रूग्णायात उपचारासाठी बेड उपलब्ध नाहीत. अशावेळी ग्रामीण-शहरी भागात अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात असतात. या रुग्णांना लक्षणे असल्यास त्यांना आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयाने द्याव्यात, असे आदेश यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, तरीदेखील काही खासगी रुग्णालये या सूचनांचे पालन करत नाहीत. किरकोळ उपचार करत वेळ घालवतात. रूग्णाचा आजार वाढल्यानंतर शेवटच्या क्षणी त्याला सरकारी रूग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या जातात. शेवटच्या २४ ते ४८ तासांतील मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. हे मृत्यू लपविण्यासाठी खासगी रूग्णालये शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात रुग्णाला पाठवत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा