नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. पीएम मोदींनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत मदत जाहीर केली आहे. अशा मुलांना 18 वर्षांपर्यंत मासिक मदत आणि वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाखांचा निधी देण्यात येईल. केंद्र सरकार अशा मुलांना मोफत शिक्षणही देईल. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ही माहिती दिली आहे.
कोरोनामुळे आई आणि वडील गमावले आहेत अशा मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज सहाय्य दिले जाईल, अशी माहितीही पीएमओने दिली. त्याचे व्याज पीएम कॅरेस फंडमधून दिले जाईल. यासह, त्यांना 18 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचा विनामूल्य आरोग्य विमा देखील मिळणार आहे. त्याचे प्रीमियम पीएम केअर फंडमधून दिले जातील.
PM @narendramodi announces number of benefits to children impacted by COVID pandemic
— PIB India (@PIB_India) May 29, 2021
✅ '#PMCARES For Children' launched for support & empowerment of #COVID19 affected children
✅ Free education for children who lost their parents to #COVID19
Details: https://t.co/3cGHUOJhh0 pic.twitter.com/a6Khs2nYL5
या विशेष मदतीची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अशा कठीण काळात आपल्या मुलांची काळजी घेणे आणि उज्ज्वल भविष्याची आशा जागृत करणे हे एक समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, पंतप्रधान केअर फॉर चिल्ड्रेनच्या सौजन्याने कोरोना बाधित मुलांना मदत आणि सबलीकरण करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांबरोबर सरकार उभे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा