कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल दराने आज शंभरी पार केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज पेट्रोलचा दर प्रति लीटर 100 रुपये 14 पैसे झाला आहे. तर प्रीमियम पेट्रोलचा दर 105 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेली तीन-चार दिवस सतत काही पैशांची वाढ होत आज चक्क 100 रुपये 14 पैशे इतकी किंमत साध्या पेट्रोलची झाली आहे. तर प्रिमीयम पेट्रोल 105 रुपये प्रति लिटर झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कराचाही दरवाढी मध्ये मोठा वाटा आहे.
सध्या कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनकडे आलेला आजचा दर हा प्रति लिटर 99 रुपये 88 पैसे आहे. तरीही कोल्हापुरातील पेट्रोल पंपावर शंभर रुपये 14 पैसे मीटर पडत आहे. तितकीच रक्कम पेट्रोल पंप कर्मचारी घेत आहेत. याबाबत कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले, की मिरज हा डेपो आहे. तेथे पेट्रोलचा प्रतिलिटर दर 99 रुपये 88 पैसे आहे. प्रत्यक्षात कोल्हापूर पर्यंत हे पेट्रोल पोहोचण्यासाठी वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे काही पैशांची वाढ या दरात होते. त्यामुळे कोल्हापुरात शंभर रुपये 14 पैसे लिटर साधे पेट्रोल मिळणे स्वाभाविक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा