पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'यास' चक्रीवादळ हे तौक्ते चक्रीवादळापेक्षाही तुफानी असणार आसल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पश्चिम बंगाल, ओडीशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड या राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे चक्रीवादळ ओडिसा च्या बालासोर ला उद्या सकाळी 11 पर्यंत धडकणार आहे, यावेळी त्याचा वेग १०० ते १५० किमी प्रती तास असणार आहे. यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने ओडिसा च्या 8 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे. ओडिसा च्या बालासोर, भद्रक, केंद्रपाडा, जगातसिंहपूर या जिल्हयाना सर्वाधिक फटका बसणार आहे. या वादळचा सामना करण्यासाठी ओडिसा मध्ये ५२ तर बंगाल मध्ये ३५ NDRF, SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या २० जिल्हे या वादळामुळे प्रभावित होणार असून येथील १० लाख लोकाना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
महाराष्ट्रावर काय होणार परिणाम ?
फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या चक्री वादळाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे हे वारंवार दिशा बदलत आहे त्यामुळे ते नक्की कुठे धडकेल याचा अंदाज लावणे जड जात आहे. या चक्रीवादळचा परिणाम ओडिसा पश्चिम बांगळसोबतच, बिहार, हरियाणा, आसाम आणि मेघालयच्या च्या काही भागात जाणवण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा