Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

२५ मे पासून सुरु होणाऱ्या विद्यापीठ परीक्षेसाठीच्या ऑनलाइन पर्याय निवडीसाठी पुन्हा मुदतवाढ १८ मे सायं. ५.०० वाजेपर्यंत : परीक्षा संचालक श्री गजानन पळसे

 

परीक्षा संचालक श्री गजानन पळसे



गीता माने/ सहसंपादक :


   शिवाजी विद्यापीठ पत्र संदर्भ क्रमांक/ शिवाजी विद्यापीठ/ परीक्षा विभाग/ ३३७ दिनांक ११ मे २०२१ अन्वये विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या दिनांक २५ मे पासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय निवडून विद्यापीठ संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी दिनांक १५ मे २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सदरची मुदत दिनांक १६ मे २०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती.

  तथापि उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती आणि सुरू असणारी टाळेबंदी विचारात घेऊन सदरची मुदत दिनांक १८ मे २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. तरी सदरची बाब आपल्या स्तरावरून विद्यार्थ्यांना अवगत करावी अशा प्रकारची माहिती परीक्षा संचालक गजानन पळसे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा