प्रा.अक्षय माने / प्रमुख प्रतिनिधी :
दिल्ली पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेला एक महाकाय हिमनग अंटार्क्टिका मध्ये मोठ्या हिमनगासून तुटला. यामुळे जगभरातील संशोधका मध्ये एकच खळबळ माजली आहे. हा तुटलेला हिमनग युरोपियन स्पेस एजन्सी चा उपग्रहाने सर्वप्रथम फोटो टिपले असून हा हिमनग अंटार्क्टिका मधील वेडेल समुद्रातील रोंने आईस शेल्फ पासून वेगळा झाला आहे. तसेच वेड्डेल समुद्रात तो हिमनग तरंगत आहे. या हिमनगाची लांबी १७० किमी आणि रुंदी २५ किमी इतकी महाकाय आहे. युरोपियन स्पेस एजन्सी नुसार पश्चिम अंटार्क्टिका मधील वाढलेल्या तापमानामुळे ही घटना घडली असून भविष्यात त्याचा धोका वाढणार आहे.
ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे अंटार्क्टिका मधील अनेक हिमनग वितळत असून समुद्राची पाणीपातळी वाढत जाऊन समुद्रा किनारी असणाऱ्या देशांना भविष्यात मोठा फटका बसणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा