प्रा. मेहबूब मुजावर : प्रमुख प्रतिनिधी
शिरोळ तालुका मानव अधिकार सुरक्षा सेवा संघाने तालुका पातळीवर काम करणारे सर्वच पदाधिकारी हे अतिशय प्रामाणिक व उत्साहाने काम करीत आहे.त्यामुळे त्यांच्या कार्याची पूर्ण माहिती व त्यांनी केलेली कामगिरी पाहून 'शिरोळ तालुका अखिल भारतीय नाथ समाज संघटनेने शिरोळ तालुक्यातील मानव अधिकार सुरक्षा सेवा संघ शिरोळ तालुका कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर पत्रकार रोहित जाधव यांचे समाजातील कार्य आणि त्याची समाजाविषयी असलेलं प्रेम तळमळ,त्याच बरोबर जीवाची पर्वा न करता निर्भिड पत्रकार म्हणून केलेली कामगिरी पाहून त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम कुरुंदवाड येथील मानव अधिकार सुरक्षा सेवा संघ यांच्या मीटिंग हॉल मध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून पार पडला, याप्रसंगी मानव अधिकार सुरक्षा सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हा सचिव सचिन डवरी,शिरोळ तालुका अध्यक्ष ऋषिकेश कोळी, उपाध्यक्ष प्रितम कोळी,कार्याध्यक्ष मकरंद कोळी,सचिव महेश शिकलगार,सहसचिव आशपाक नदाफ,महासचिव यशवंत कोळी,तालुका प्रमुख अक्षय शेडबाळे,उपप्रमुख अजय माने,संपर्क प्रमुख केदार शुक्ल,कार्यकारणी सदस्य ऋषिकेश चौगुले, मीडिया प्रभारी नागेश गायकवाड,महिला शिरोळ तालुका अध्यक्ष कु.श्रुती कोळी,महिला शिरोळ तालुका उपाध्यक्ष राधिका कुलकर्णी त्याच बरोबर अखिल भारतीय नाथ संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष विकेश वाटकर, उपाध्यक्ष लखनकुमार जाधव,सल्लागार रामदास वाटकर,पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक श्रीमती भाग्यलता जाधव, हातकणंगले युवा सेना अध्यक्ष सुशांत जाधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा