Breaking

रविवार, ३० मे, २०२१

जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या वतीने मा.रामेश्वर वैंजने यांनी शिवार कोविड केअर सेंटरला PPE KIT & N-95 Mask चे माजी खासदार मा.राजू शेट्टी यांचेकडे केले सुपुर्द"

 


गणेश कुरळे : प्रमुख प्रतिनिधी 

   सामाजिक संवेदनशीलता दाखवीत  जयसिंगपूर पोलीस ठाणे कडून उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर मा.रामेश्वर वैंजने यांच्या हस्ते शिवार कोविड केअर सेंटरला आवश्यक असणारे PPE KIT & N-95 Mask माजी खासदार राजू शेट्टी यांचेकडे  सुपुर्द करण्यात आले.

      कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजला असताना महाराष्ट्र पोलीस दल मात्र आपलं नियमित कायदा- सुव्यवस्थेचे कार्य चोखपणे बजावीत आहे. त्याचबरोबर अहोरात्र पणे कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी शासनाचे हात ही बळकट करण्याचा प्रयत्न करीत ही दुहेरी भूमिका मनस्वीपणे बजावीत आहेत. मात्र या बरोबरच एक माणुसकी म्हणून भावनिक संवेदनशीलतेच्या माध्यमातून महाराष्ट् पोलीस राज्यात माणुसकीचे दर्शन घडवित आहेत.

       त्यामुळेच मिशन संवेदना अंतर्गत जयसिंगपूर पोलीस ठाणे सातत्याने आपली दुहेरी भूमिका पार पाडीत या अगोदर जयसिंगपूर शहर व परिसरातील  गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू व N-95 मास्कचे वाटप केले आहे. तसेच माजी खासदार मा.राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना महामारीच्या या काळात गरीब व गरजू कोरोना रुग्णांना कमी खर्चात योग्य सेवा मिळावी या उदात्त हेतूने सुरू केले आहे. दानशूर लोकांनी दिलेल्या देणगीतून व अन्य घटकांच्या सहकार्यामुळे  हे कोविड सेंटर सुरू आहे. या कोविड सेंटरला अंशतः  हातभार लागावा या हेतूने जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने सेंटरला लागणारे PPE किट व N-95 मास्क देण्यात आले.

   DYSP मा.रामेश्वर वैंजने  यांच्या उत्तम मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या कुशल नेतृत्वाखाली जयसिंगपूर पोलीस ठाणेतर्गत पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व होमगार्डस सामाजिक बांधिलकी व मानवी संवेदनशीलता दाखवित आहेत. खरोखरच त्यांचे कार्य उत्तम व कौतुकास्पद आहे हे सत्य मान्य करावे लागेल.

        याप्रसंगी नगरसेवक शैलेश चौगुले,सामाजिक कार्यकर्ते शैलेश आडके, महावीर पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

       सामाजिक बांधिलकीच्या या कामामुळे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

२ टिप्पण्या: