Breaking

रविवार, १६ मे, २०२१

म्युकर मायकोसिस : कोरोना होऊन गेल्यानंतर होणाऱ्या या रोगामुळे पेशंटचे डोळे का होत आहेत निकामी ? जाणून घ्या सविस्तर माहिती

 



प्रमुख प्रतिनिधी: अक्षय माने

ब्लॅक फंगस किंवा म्युकर मायकोसिस मुळे पेशंटचे डोळे निकामी का होत आहेत? 

म्यूकर मायकोसिस हा म्युकर मायोसिटीस (mucor myositis) नावाचा विषाणू समूह आहे ज्याला ब्लॅक फंगस (बुरशी) म्हणून ओळखले जाते. सामान्यतः हा ब्लॅक फंगस जमिनीवर सापडतो जिथे घाणआहे, कुजलेली गोष्ट आहे अशा ठिकाणी. हवेमध्ये सुध्दा ही बुरशी आढळते पण जमिनीपेक्षा याचे प्रमाण खूप कमी असते. या बुरशी चा धोका ज्यांना जास्त शुगर आहे, HIV पेशंट ना अधिक आहे. 

💡सध्या या आजाराचे प्रमाण का वाढले आहे?

जे कोविड चे पेशंट आहेत ज्यांना अनियंत्रित शुगर आहे त्यांना बरे करण्यासाठी (steroid) स्टिरॉइड चे जास्त डोस दिले जातात त्यामुळे अशा पेशंट ना ब्लॅक फंगस (Black Fungus) हा आजार होण्याची प्रमाण वाढले आहे. 

हा आजार नाकामध्ये जिथे (sinus) नाकातील हाड तिथे होतो, त्यानंतर तो डोळ्यांना आणि शेवटी मेंदू पर्यंत जातो. त्यामुळे या आजाराला (Rhinocerebral) रहिनोसेरिब्रल म्हणजे नाकावाटे मेंदूला होणारा आजार असे म्हंटले जाते. 

तसेच हा आजार फुफ्फुसाला होऊ शकतो आणि आतड्यांना सुध्दा होऊ शकतो. 

आपल्याला हा आजार झाला आहे हे ओळखायच कसं?

या आजाराला ओळखायचं असेल तर आपल्या तोंडामध्ये टाळूवर काळा ठिपका दिसतो, तसेच नाकामध्ये काळा ठिपका पडतो व तो भाग सुजतो तसेच डोळ्याच्या खालचा भाग सुध्दा सुजतो. आजार जर जास्त प्रमाणात झाला असेल तर डोळ्या खाली सुजलेल्या भागावर बोट ठेवले असता संवेदना जाणवत नाहीत, रुग्णाला जास्त ताप येतो व सूज आलेल्या डोळ्याला दिसायचे कमी यायला सुरुवात होते. 

💡 कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी हा आजार होतो?

कोरोना काळात सुध्दा म्युकोर मायकोसिस होऊ शकतो पण कोरोना झाल्यानंतर 3 ते 4 आठवड्यानंतर याची लक्षणे दिसत आहेत. असे का होते तर कोरोना काळात झालेल्या औषध उपचारामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे हा आजार रूग्णांना होत आहे असे दिसून येत आहे. 

 💡हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी

प्रथम ज्यांना मधुमेह आहे किंवा (immunocompromised) रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले अशा रुग्णांनी त्यांनी स्वतःचा मधुमेह नियंत्रित करावा तो वाढू देऊ नये ज्यामुळे आपल्याला या आजार होणार नाही. 

तसेच कोरोना रूग्णांना बरे होण्यासाठी जे स्टिरॉइड (methylprednisolone) दिले जात आहे त्यांचे प्रमाण डॉक्टर नी योग्य राखले तर हा आजार होणार नाही. (योग्य प्रमाण 40 ते 60 मिलिग्रम दिवसातून 2 वेळा असे फक्त 3 ते 5 दिवस फक्त)

 💡हा आजार किती धोकादायक आहे?

वेळीच योग्य निदान आणि उपचार झाले नाहीत तर हा आजार मेंदूपर्यंत जाऊन मृत्यू होऊ शकतो किंवा डोळा निकामी होऊन काढून टाकावा लागतो. 

💡 या आजारावर घरी उपचार करावे की हॉस्पिटल मध्ये जावे लागते?

या आजारावर घरी उपचार होऊ शकत नाहीत आणि जेवढे लवकर याचे निदान होईल तेवढं लवकर त्यावर उपचार करून आपले अवयव जसे की डोळा निकामी होण्यापासून वाचवता येतो. 

💡सरसकट  सर्व भरती झालेल्या कोरोना रूग्णांना हा आजार होतो की थोड्या रुग्णांना?

जे रुग्ण हॉस्पिटल मध्ये आहेत आणि ज्यांना ICU मध्ये भरती केले आहे आणि ज्यांना अनियंत्रित मधुमेह अशा रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. जर रुग्णालयांनी ICU units निर्जंतुक केले तर हा आजार होण्याची शक्यता कमी होते.

💡म्यूकोर मायकोसीस हा आजार कोरोना प्रमाणे संसर्गजन्य आहे का?

नाही. हा आजार संसर्गजन्य नाही. तो घरातील एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. त्यामुळे घरातील इतर व्यक्तींनी घाबरून जायचे कारण नाही.

💡डोळ्या खालची प्रत्येक सूज किंवा नाकाजवळील सूज ही म्यूकोर मायकॉसिस असू शकते का?

प्रत्येक वेळी डोळ्याखालील किंवा नाकाजवळील सूज ही म्युकोर  मायकॉसिस नसते पण सतत सूज येत असेल तर लवकर डॉक्टर ना दाखवून त्याचे निदान लवकर करणे आवश्यक आहे जेणेकरून पुढील धोका टाळता येऊ शकतो. 


टीप: डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य (सदस्य कोविड टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य) यांच्या एबीपी माझा वरील 7 मे 2021 मुलाखतीचा सारांश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा