रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी:
मिरज येथील आशीर्वाद क्लासेसचे संचालक संजय पंडित कुलकर्णी यांचे चिरंजीव स्वप्निल याची जर्मनीतील कार डिझाईन्स करणाऱ्या जगप्रसिद्ध अल्टीन कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विभागात उच्च पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे. ही कंपनी फोक्सवॅगन, रेनॉल्ट आदी कंपन्यांच्या कारचे डिझाइन्स करत आहे.
स्वप्नीलचे शालेय शिक्षण मिरजेतील अल्फोंसा स्कूल येथे झालेले होते.अकरावी -बारावी सायन्सचे शिक्षण विद्या मंदिर प्रशाले तून त्याने घेतले.जे जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज जयसिंगपूर मधून त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी घेतलेली होती. तो पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला गेला होता. जर्मनीमध्ये त्याने एम.एस. ही पदवी घेतली .त्यानंतर फोक्सवॅगन या कंपनीत एक वर्ष इंटर्नशिप केली होती.कोरोना काळात बरीच भारतीय मंडळी भारतात परत आली .परंतु स्वप्निलने आपली चिकाटी सोडलेली नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून त्याची या उच्च पदावर नेमणूक झाली.
स्वप्निलच्या या उत्तुंग यशाबद्दल, त्याचे वडील संजय कुलकर्णी तसेच त्याची आई सौ. संगीता कुलकर्णी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Very good information And heartily congratulations.
उत्तर द्याहटवा