Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

DRDO कडून कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या 2 डीजी औषधाचे अनावरण : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी औषधाचा पहिला बॅच केंद्रीय आरोगयमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केला सुपूर्द

 



नवी दिल्ली: कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या 2 डीजी औषधाचे लाँचिंग संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले. 2 डिओक्सि-डी-ग्लुकोज अर्थात 2 डीजी औषध (2-deoxy-D-glucose drug) डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी औषधाचा पहिला बॅच (10 हजार डोसेस) केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना दिला.


‘२-डीजी’ औषधाला गेम चेंजर का संबोधले जात आहे?

     डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅबरोटरीज या दोघांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या ‘२-डीजी’ औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांवेळी या औषधाच्या मात्रा ज्यांना दिल्या गेल्या त्या रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्णांना तिसऱ्या दिवशी बाहेरून ऑक्सिजन देण्याची गरज भासली नाही.

     ज्या  रुग्णांना हे औषध देण्यात आले त्यांच्यात नाडीचे ठोके, रक्तदाब, ताप आणि श्वसनाची गती या लक्षणांमध्ये त्वरित सुधारणा झाल्याचे आढळले. ६५ वर्षे वय असलेल्या रुग्णांमध्येही सकारात्मक बदल निदर्शनास आले. ‘२-डीजी’ औषधाने केवळ ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होत नाही तर रुग्णालयातील मुक्कामाचा अवधीही कमी करतो, असा दावा डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.


कसं काम करते हे औषध ?

‘२-डीजी’ औषध फक्त कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या पेशींमध्ये जमा होते.

कोरोना विषाणू ऊर्जेसाठी या औषधाचा ग्लुकोज समजून वापर करायला लागतात.

येथेच फसगत होते. विषाणूला ऊर्जा प्राप्त होत नाही उलटपक्षी ऊर्जा रोखली जाते. त्यामुळे विषाणूचा फैलाव बंद होतो.

 



किंमत किती असेल ?

     जेनेरिक औषध असल्याने औषधाच्या एका पाऊचची किंमत ₹ ५०० ते ६०० पर्यंत असेल.

औषध कसे आणि किती घ्यावे...

ग्लुकोज पावडरींप्रमाणे हे औषध पाऊचमध्ये पावडर स्वरूपात मिळू शकेल. ते पाण्यात टाकून बाधिताला दिले जाते.

     डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये, असा सल्लाही डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा