Breaking

सोमवार, ७ जून, २०२१

"शानदार ऑफर! अवघ्या 23 हजारात घरी आणा Bajaj Discover 100Std बाईक"

   

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल.

      आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

        CredR वर तुम्हाला केवळ 23,000 रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Discover 100Std बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 100cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही एक सेकेंड ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

     ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Bhilwara-Biliya/Bajaj-Discover-100Std/16545) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक राजस्थानमधील भिलवाडा येथे उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 22,041 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

कशी आहे Bajaj Discover 100?

Bajaj Discover 100 या बाईकची एक्स-शोरूम किंमत जवळपास 50 हजार रुपये इतकी आहे. ही बाईक कंपनीने 2015 मध्ये बंद केली होती. Bikedekho वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या बाईकमध्ये 94.38cc चं इंजिन देण्यात आलं आहे. जे 7.7ps पॉवर आणि 7.85Nm टॉर्क जनरेट करतं. यासह या बाईकमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. ही बाईक 84 Kmpl इतकं मायलेज देते.


(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा