ऑनलाइन पर्याय निवडण्याची अंतिम तारीख १३जून पर्यंत:
प्रा.अक्षय माने/ कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :
शिवाजी विद्यापीठाने कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन परीक्षा कामासंदर्भात आत्तापर्यंत अत्यंत उत्तम व उचित कार्यवाही केली आहे. त्याचाच भाग म्हणून व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्राप्त परिस्थितीचा सारासार विचार केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सद्या सातत्याने वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या व शासनाने लोकहितार्थ विचार करून तसेच शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांना अधीन राहून शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक मा.गजानन पळसे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धत स्वीकारण्याबाबत आवाहन केले आहे.
विद्यापीठाच्या संदर्भीय पत्र क्रमांक ७/६/२०२१ नुसार ऑक्टो/ नोव्हें २०२० हिवाळी सत्राच्या विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेमधील ऑफलाइन पद्धतीने निवडलेल्या किंवा कोणताच पर्याय न निवडलेल्या व शासन निर्णयानुसार व युजीसीच्या दि. ६ मे २०२१ च्या निर्देशानुसार ऑफलाइन परीक्षा देता न आलेल्या परीक्षार्थींची कोविड -१९ पार्श्वभूमीवर शेवटची संधी म्हणून फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत.
ज्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या ऑक्टो/नोव्हें. २०२० हिवाळी सत्रा करीता यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने परीक्षेचा पर्याय निवडलेला आहे किंवा कोणताच पर्याय निवडलेला नाही अशा सर्व( विद्यापीठ अधिविभाग/संलग्नित महाविद्यालये/ दुरशिक्षण केंद्राकडील) विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडण्यासाठी दि.१३/६/२०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खालील प्रमाणे लिंकचा पर्याय विद्यार्थी स्तरावर उपलब्ध करून देण्यात आला आहे तर नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
Web Page ➡️ online.unishivaji.ac.in
➡️ Winter 2020 Imp links for students
Link ➡️ Update Students Mobile No.Email ID for Re-examination(Offline to online)
तरी संबंधित विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑनलाइन पद्धतीचा पर्याय उपयुक्त संगणक प्रणालीमध्ये सादर करावा. निवडलेल्या पर्यायाची पोहोच पावती(Confirmation Receipt) ची प्रिंट विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावी.
तसेच संबंधित अधिविभाग/ महाविद्यालयाने ऑफलाइन पद्धतीने परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणेबाबत व वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक मधून पर्याय सादर करण्यासाठी आपले स्तरावरून अवगत करण्यात यावे.
अशी प्रकारची माहिती शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभाग प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा