![]() |
शिरोळ तहसीलदार कार्यालय |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
शिरोळ येथे मंगळवार दि. २२/६/ २०२१ रोजी शिरोळ तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालय ,शिरोळ येथे समितीचे नवनियुक्त अध्यक्ष मा. प्रकाश बसगोंडा पाटील (टाकवडेकर) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस समितीचे नवनियुक्त सदस्य, रमेश चोखाजी शिंदे (बापू) रा. उदगाव, महादेव भाऊसो कोळी रा. शिरदवाड, धन्यकुमार नरसु सिद्धनाळे रा.दतवाड, केशव कृष्णा राऊत (पैलवान) रा. दानोळी, अण्णासो आप्पासो बिलोरे रा. कोंडिग्रे,भालचंद्र शंकर लंगरे रा. धरणगुत्ती, अफसर मौलाली पटेल रा. औरवाड तसेच तहसीलदार शिरोळ, अधीक्षक पंचायत समिती शिरोळ, नायब तहसीलदार संजय गांधी व संजय गांधी योजना विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीस संजय काटकर ,नायब तहसीलदार (संगायो) यांनी मा. अध्यक्ष व गठित समितीमधील हजर असलेल्या सदस्यांचे मनस्वी स्वागत केले.तसेच covid-19 च्या प्रादुर्भावामुळे माहे मार्च 21 पासून लॉकडाऊनमुळे सभा घेण्यात आलेली नव्हती असे सांगितले. त्यानंतर आजच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मंजुरीवर ठेवण्यात आले असलेबाबत समितीचे सदस्य सचिव डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ तथा तहसीलदार शिरोळ यांनी नायब तहसीलदार यांना सांगितले.त्यानंतर आजच्या सभेमध्ये खालील प्रमाणे प्रस्ताव प्राप्त झालेले असून त्यावर निर्णय घेण्याचा आहे.
प्राप्त प्रस्तावानुसार आजच्या बैठकीत एकूण 1464 अर्जावर समितीकडून निर्णय घेण्यात आला त्यापैकी 764 अर्ज मंजूर करण्यात आले तर 572 अर्जामध्ये त्रुटी व 128 अर्ज अपात्र करण्यात आले.सदरचे 572 त्रुटी मधील अर्ज गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांचेकडे पाठवून पंधरा दिवसात त्रुटी पूर्तता करून घेऊन पुढील बैठकीत ठेवण्यात येतील असे सदस्य सचिव तथा तहसीलदार शिरोळ यांनी सांगितले.
त्यानंतर उपस्थितांचे मान्यवरांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा