करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने आठ दिवसांपूर्वी जयसिंगपुर शहरांमध्ये दहनभुमीचे शेड उभारावे आणि शहरातील बेवारस प्रेतावर मोफत नगरपरिषदेने अंत्यसंस्कार करावेत या मागणीसाठी जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मा.टीना गवळी यांना निवेदन देऊन मागणी केली होती.
![]() |
जाहिरात प्रमोशन |
मात्र जयसिंगपूर नगरपरिषदेने या मागणीची गांभीर्याने दखल घेत जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासनाने बेवारस प्रेतावर मोफत अंत्यसंस्कार करण्याचे व कॉन्सिल सभेमध्ये स्मशानभूमीचा विषय घेऊन तो मार्गी लावण्याचे लेखी पत्र दिल्याने उद्या बुधवार दि.२३/६/२०२१ रोजी नगर परिषद समोर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे पदाधिकारी जिवंत समाधी घेणार होते. मात्र प्रशासनाकडून लेखी मिळालेल्या आश्वासनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे अशा प्रकारची माहिती राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे अध्यक्ष प्रा. गंगाराम सातपुते यांनी दिली आहे.
![]() |
जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासनाचे लेखी पत्र |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा