![]() |
राही सरनोबत |
दिल्ली: क्रोएशियाच्या ओसीजेकमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताच्या मराठमोठ्या नेमबाज राही सरनोबत हिनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २५ मीटर एअर पिस्तल प्रकारात राहीनं ३९ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त करत सुवर्णपदक जिंकलं. तर फ्रान्सच्या माथिल्डे लामोले हिनं ३१ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. तर रशियाची विन्टालिना २८ गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.
मूळची महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील राहीचं कोल्हापूरसह देशभरातून कौतुक केलं जात आहे.
राहीनं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत जागतिक पातळीवर नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत आपली चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली. सुरुवातीपासूनच आघाडी घेत राहीनं अचूक लक्ष्यवेध घेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. तर दुसरीकडे भारताच्या मनु भाकर हिला ७ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा