![]() |
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ..डी.टी.शिर्के |
प्रा.डॉ.प्रभाकर माने/ मुख्य संपादक:
महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीचे अभ्यासक, प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा.डॉ.सुधाकर मानकर लिखित महाविद्यालय व्यवस्थापन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अतुल प्रकाशन संस्थेने आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.डी.टी. शिर्के यांच्या हस्ते व प्राचार्य संघटनेचे राज्य नेते व अध्यक्ष डॉ.क्रांतीकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक, प्रो.डॉ.बी.एम.हिर्डेकर यांच्या उपस्थितीत प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.
![]() |
डॉ.सुधाकर मानकर |
ऑनलाइन पद्धतीने आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या सुरुवातीस डॉ. सुधाकर मानकर यांनी उपस्थित मान्यवरांचे मनस्वी स्वागत करून या पुस्तक लेखनामागील प्रयोजन सांगताना ते म्हणाले की, महाविद्यालयीन पातळीवर प्रशासन व व्यवस्थापन चालविताना अनेक घटकांना असंख्य अडचणीं व प्रश्नांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापन पातळीवर दर्जेदार व बदलत्या प्रशासन व्यवस्थेला आधुनिक व्यवस्थापनाचा स्पर्श करण्याच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध पुस्तक असणे आवश्यक होतं यासाठी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना उच्चशिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांची असल्याने या ग्रंथाला एक विशेष प्रतीचा दर्जा व वेगळेपण दिसून येते.
या ऑनलाईन सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थित असणारे डॉ.बी.एम.हिर्डेकर या पुस्तक लेखनाबाबत मूल्यांकन व विवेचन करताना ते म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे डॉ.मानकर सरांनी दिलेल्या आजपर्यंतचे शैक्षणिक लढे, संघटनात्मक बांधणी व एकूण कार्याची व्याप्ती या पुस्तक रूपाने प्रतीत होत आहे. विद्यापीठ व महाविद्यालय समोरील व्यवस्थापकीय प्रश्ने त्यामुळे दुरावलेले संबंध जोडण्याचे काम या ग्रंथाच्या माध्यमातून झाले आहे तसेच शैक्षणिक क्षेत्राची प्रगती व व्याप्ती वाढविणारा ग्रंथ म्हणून शैक्षणिक प्रवाहात प्रसिद्ध होईल असे गौरवोद्गार त्यांनी या ग्रंथाबाबत काढले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.डी.टी. शिर्के या पुस्तकावर भाष्य करताना म्हणाले की, शिक्षण प्रवाहात असणाऱ्या सर्व घटकांना उत्तम मार्गदर्शन करणारे तसेच संदर्भग्रंथ म्हणून हे सर्वांना उपयोगी पडणारे आहे. नवोदित प्राचार्यांच्या उजळणी वर्गाला हे पुस्तक दिशादर्शक ठरणार असून ते लाभार्थी होणार यात तिळमात्र शंका नाही. हे पुस्तक म्हणजे १८ प्रकरणे व दोन परिशिष्टासह परिपूर्ण असलेलं बृहद ग्रंथ आहे. तसेच सरते शेवटी ते म्हणाले की,डॉ. मानकर म्हणजे सिद्धहस्त लेखक आहेत.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉक्टर क्रांतीकुमार पाटील अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, डॉ.मानकर यांनी सन 1983 पासून शैक्षणिक प्रवाह बदलत गेले त्या बदलत्या परिस्थितीनुसार स्थापनेपासून आतापर्यंत त्याचं विस्तृत विवेचन करणारी मांडणी या पुस्तकाच्या माध्यमातून दिसत आहे. तसेच डॉ.मानकर यांनी शैक्षणिक प्रश्न, गरजा पाहून व सद्य परिस्थितीचा विचार करून सर्वसमावेशक व परिपूर्ण पुस्तकाचे लेखन केले आहे.
या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना प्रा.डॉ. अरुण शिंदे म्हणाले,या ग्रंथाचे स्वरूप,आशय, मूल्य व महत्त्व उच्च कोटीचे असल्यामुळे हा खरोखरच मार्गदर्शक ठरणार आहे.या ऑनलाइन सोहळ्यात उपस्थित असणारे मान्यवर, प्राध्यापक व अन्य इतर घटकांचा आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात शैक्षणिक चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ.बी.टी. देशमुख,प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, मान्यवर प्राचार्य व शेकडो प्राध्यापक उपस्थित होते. हा पुस्तक प्रकाशन सोहळा आनंदमय वातावरणात व सांगोपांग वैचारिक मंथनाने पूर्ण झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा