लेखन :
राहुल सहदेव घाटगे
जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर
संपूर्ण विश्वात कोरोना साथीमुळे भयावह परिस्थिती निर्माण झालेली असताना मनुष्य माणूसपण सोडून स्वार्थी भावनेने मिळते ते ओरबडण्याचा प्रयत्न करीत आहे. माणसाची सर्व पातळीवर पिळवणूक करून स्वार्थी भावनेने जगणं ही मनुष्यासाठी नवीन गोष्ट नाही. मात्र या कोरोना काळात स्वतःच्या संपत्तीचा वापर समाजहितासाठी करणारे काही देवदूताचे दर्शन ही झालं. आजच्या या गंभीर परिस्थितीत या साथीला तोंड देऊन माणसातला देव शोधून या सद्य परिस्थितीवर मात केली पाहिजे. अशा अकल्पित व बिकट परिस्थिती समोर जगण्याची जिद्द आणि चिकाटी सोडली नसली पाहिजे. प्रत्येक घटकाला अशा भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागत नाही तोपर्यत तिचे गांभीर्य आपणास समजत नाही. ज्या पद्धतीने निसर्ग आपल्या मधील सर्व जीविकाना उपयोग होईल अशी नैसर्गिक स्वभाव सोडत नाही. त्याचप्रमाणे निसर्ग प्रत्येक बिकट परिस्थितीमध्ये आपणास जगण्यास शिकवितो. आपण तर मनुष्य आहोत या निसर्गाकडून काहीतरी शिकवण घेणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी माणुसकी हा धर्म पाळला पाहिजे. माणुसकीचा नेमकेपणा या काव्यपंक्तीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
"जीवन हे एक गणित आहे,
जन्म ही त्याची बेरीज आहे,
बालपण ही त्याची वजाबाकी आहे,
तारुण्य हा त्याचा गुणाकार आहे,
म्हातारपण हा त्याचा भागाकार आहे,
आणि शेवटी
मृत्यू हे त्याचे उत्तर आहे."
वरील काव्यपंक्तीतून मनुष्याचे जीवन हे नश्वर असून माणसाने माणूस पण जपत उत्तम जीवन जगण्याची शैली जोपासली पाहिजे. कारण माणसाच्या आयुष्यात जन्म व मृत्यूच्या या टप्प्यात बऱ्या-वाईट प्रसंगाचा अनुभव येत असतो. जर माणसाला मृत्यू एकदाच मिळतो पण त्याला जीवन रोज मिळत असते तर त्याचा उपयोग सत्य कार्यासाठी लावला पाहिजे.ज्या पद्धतीने वर्तुळ जिथून चालू होतो परत तिथे येऊन संपतो . पण हे वर्तुळ पूर्ण होण्यासाठी लागलेला संघर्ष, परिश्रम, किती महत्त्वाचा असतो. त्याच पद्धतीने माणसाने तिच्या कर्मरूपी वर्तुळामध्ये ममता, प्रेम आणि माणुसकी जपली पाहिजे. या जगामध्ये जीवन जगत असताना तुमच्याजवळ किती पैसा व भौतिक संपत्ती आहे यापेक्षा तुम्ही जीवन जगताना इतर मनुष्या बरोबर आपण प्रेमाने व माणुसकीने वागतो का हे पहिलं जाते.पण या एकविसाव्या शतकामध्ये कुठेतरी माणुसकी कमी पडत आहे. तसेच स्वतःचे उत्तम जीवन हे स्वतः मनुष्यप्राणी संपवू पाहात आहे.
या बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज आपण ठाम निर्धार करून समाजामध्ये राहत असताना कोठेतरी माणुसकी जतन करून इतरांना मदतीचा एक हात देऊन सहकार्य करूया. कारण कोरोना महामारीच्या या काळात यापेक्षा ही दुर्देवी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे माणुसकी जपत एका माणसाने दुसऱ्या माणसाला मनापासून सहकार्य करीत जीवन सफल करावे हीच अपेक्षा आहे. यानिमित्ताने साने गुरुजी यांची काव्यपंक्ती आठवते
'खरा तो एकची धर्म ! जगाला प्रेम अर्पावे'!
Very nice 😍
उत्तर द्याहटवा