Breaking

मंगळवार, १५ जून, २०२१

"पालवी फौडेशन दानोळी निर्मित देवराई वॄक्षारोपणाचा एक अभिनव रचनात्मक उपक्रम"

 



रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :


       देशात कोरोना रोगाने थैमान घातले असुन देशात सर्वत्र ऑक्‍सिजनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गोष्टीचा सारासार विचार करून दानोळी ता. शिरोळ येथील समाजाभिमुख काहीतरी काम करावे असे वाटणाऱ्या तरुणाईने  लाॅकडाऊनच्या काळात गेल्या वर्षी एकञ येऊन दानोळी गावासाठी व आजुबाजुच्या परिसरासाठी एक सामाजिक उपक्रम करण्याचा निर्णय घेतला होता. दानोळी गावाच्या परिसरातील डोंगरावरती ५००० झाडे लावली तसेच ५ ते  ८ हजार बिया टोकण केल्या. पण पाण्याची सोय नसल्याने पालवी फौडेशनच्या सदस्यांनी गावापासून पासून दिड किलोमीटर अंतरावर १२० एकरच्या फौंडामाळ्यावर वृक्षारोपण करुन नंदनवन करण्यांचा निर्णय घेतला. तेथे सुरूवातीला देवराई फौडेशन पुणे व सह्याद्री देवराई याचेकडुन १००० झाडे देण्यांत आली. तसेच वॄक्षासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था तेथील शेजारी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते चवगौड पाटील यांनी करून दिली. सदर फौडेशनच्या सर्व सदस्यानी स्व:खर्चाने व  गावातील काही दानशुर व्यक्तीच्या मदतीच्या सहकार्याने देवराईमध्ये वृक्षारोपण करून एक आगळा वेगळा जैवविविधताचा एक मोठा वॄक्षारोपणरुपी प्रकल्प राबवित आहेत. ही देवराई फुलून दानोळी व दानोळी परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी वनराईने नटलेला व प्रचंड ऑक्सिजनचा पुरवठा  करणारा परिसर निर्माण व्हावा यासाठी त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तीना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

      खरंच दानोळीतील या तरुणांच्या देवराईरुपी वनराईने एक वेगळा उपक्रम राबवून समाजाला विधायक कार्याकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा