Breaking

मंगळवार, १५ जून, २०२१

"मिरजमध्ये एका डॉक्टरची आत्महत्या; घटनास्थळी मिळाली सुसाईड नोट"

 



प्रविणकुमार माने : उपसंपादक


   मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान,नाक व घसा(ENT) विभागातील आजी व्याख्याते म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ.ग्यानबा चोखोबा सूर्यवंशी( वय ६२, रा. मूळ अमरावती सध्या कर्मवीर चौक मिरज) असे आत्महत्या केलेल्या डॉक्‍टरचं नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळून आहे.

     डॉ.ग्यानबा सूर्यवंशी सध्या कर्मवीर चौकातील प्लाझा या इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. ४ वर्षांपूर्वी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली होती. त्यांची पत्नी व मुलगी डॉक्टर असून सोमवारी ते फोन उचलत नसल्याने डॉक्टर पत्नीने शेजाऱ्यांना फोन वरून विचारणा केली शेजाऱ्यांनी याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, डॉ.सूर्यवंशी यांनी बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून घेतल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले. सध्या पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा