Breaking

मंगळवार, २९ जून, २०२१

जैनापूर येथील गरीब महिलांना संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्यांचे वाटप ; महिला शक्ति विकास सेवा संस्था,सांगली



प्रा.मेहबूब मुजावर : जैनापूर प्रतिनिधी


 कोरोनाच्या काळात गरीब व गरजू घटकांना जैनापूर या गावात महिला शक्ति विकास सेवा संस्था,सांगली यांच्या वतीने संसारोपयोगी साहित्य v अन्नधान्य वाटप करण्यात आले.

        यावेळी 'एक हात मदतीचा... महिलांना शक्तीचा' हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जैनापूरातील गरजू घटकांना मोफत अन्नधान्य व वस्तूंचे वाटप करण्यात आले.

   या प्रसंगी महिला शक्तिचे  कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष सौ.तुनजा इकबाल मुजावर व सभासद सौ.दिपाली प्रशांत पाटील,सौ.हमीदा मुजावर, सौ.शुकराना मुजावर तसेच सर्व महिला शक्तीचे कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

     अशा प्रकारे महिला शक्ती विकास सेवा संस्था सांगली यांच्या वतीने एक प्रकारे गोरगरिबांना व गरजू महिलांच्या मुलांच्या शिक्षणाची ही व्यवस्था केली जाते. विधवा व परितक्त्या महिलांना मोफत मदत केली जाते. अशाप्रकारे गोरगरिब, अनाथ व परितक्त्या महिलांच्या साठी हे संस्था एक आधार स्तंभ म्हणून उभी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा