शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन कार्यशाळा :
कोल्हापूर, दि. २९
शिवाजी विद्यापीठाचा पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन विभाग आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 'माहितीच्या सत्य पडताळणी' विषयी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुगल मीटद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. दिल्ली येथील मुक्त पत्रकार आणि गुगल न्यूज इनीशेटिव्हच्या प्रशिक्षक नुपूर सोनार यांनी कार्यशाळेत बातमीतील तथ्य तपासणी आणि व्हेरिफिकेशन या विषयावर सादरीकरणासह मार्गदर्शन केले.
कोविडच्या महासाथीबरोबरच अपमाहितीचीही (फेक न्यूज) मोठी साथ आल्यासारखी परिस्थिती सध्या जाणवत आहे. पारंपरिक प्रसारमाध्यमांसह समाजमाध्यमांमधून आपल्यावर सतत माहितीचा भडिमार सुरू आहे. त्यात खरी माहिती पडताळून पाहणे सामान्य नागरिकांसाठी अवघड झाले आहे. अशा वेळी इंटरनेटचा वापर करून खरी आणि खोटी माहिती कशी वेगळी करावी, याचे सोनार यांनी मंगळवारी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी फॅक्ट-चेकिंग वेबसाइट्स, गुगल रिव्हर्स इमेज चेक, व्हिडिओ आणि जिओलोकेशन व्हेरिफिकेशन आदी साधने वापरून माहितीची सत्यता कशी तपासावी, हे उदाहरणांसह दाखवून दिले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
दरम्यान बुधवारी ह्या कार्यशाळेच शेवटचा दिवस असून यात माहितीच्या सूत्रांची तथ्य पडताळणी, इन्टरनेट चा प्रभावी वापर, फेसबुक, ट्वीटर, युटुब वरील माहितीचे पडताळणी आणि इतर विषयावर सविस्तर विवेचन होईल.
विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार आणि कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. विभागाचे प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे आणि सहयोगी प्राध्यापक चंद्रशेखर वानखेडे यांनी यासाठी विशेष साहाय्य केले. विद्यार्थिनी वंदना रंगलानी यांनी आभार मानले. या कार्यशाळेला डॉ. श्याम तारके, आर विनायक, अश्विनी कांबळे, जयप्रकाश पाटील, डॉ. राजेंद्र भस्मे, अनुराधा इनामदार, दिव्या कांबळे, डॉ. आनंद जरग, डॉ. सुनिल राजपूत, औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठ, कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठ, शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय टीटवे, वारणा महाविद्यालय, एमआईटी पुणें या ठिकाणाहून १०० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थिती दर्शवली होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा