जीवन आवळे : प्रमुख प्रतिनिधी
शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. उमेश गोविंद आवळे यांचा आज वाढदिवस दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्य करून साजरा करण्यात आला.
मा.उमेश आवळे यांनी सामाजिक संवेदनशीलता दाखवीत गंगापूर परिसरातील जवळ जवळ ७० मुलांना वह्या आणि पेन वाटप केले आहे. कोरोना महामारी पासून सुरक्षित राहण्यासाठी घरी बसुन अभ्यास करण्यासाठी कै. गोविंद बंडु आवळे सोशल फौडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
वाढदिवस साजरा हे एक निमित्त होते, वाढदिवसाचे औचित्य साधुन आपल्या भागातील लोकांना मदत व सहकार्य करणे हाच एकमेव उद्देश होता आणि राहणार अशी भूमिका या फौडैशनची आहे.या सामाजिक उपक्रमास तेरवाड गावच्या प्रथम नागरिक सौ. लक्ष्मीबाई परशुराम तराळ , सौ. हर्षवर्धना भुयेकर , संतोष भुयेकर सर, परशुराम तराळ दादा, अमोल खोत सर, सिकंदर कोठीवाले साहेब, अनिल पाटील साहेब, सचिन कांबळे सर,कुमार पाटुकले, मुरग्याप्पा हेगडे, श्रीकांत हेगडे,सुखदेव हेगडे, उमेश शेडबाले, तुकाराम आवळे, सुरेश शेडबाले, स्वप्निल बिरजे, अरविंद कोरे, दादू मोरे,अनिकेत पोवार हे सर्व उपस्थित होते. उपस्थित सर्वांना सर्वांना मास्क व सँनिटायझर देण्यात आले, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मोजक्याच पाचवी ते सातवीच्या मुलांना वह्या व पेन देण्यात आले व उर्वरित मुलांना घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते उमेश आवळे यांच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा