कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (KDC Bank)कर्जासाठी लागणारे ७/१२, ८ अ, नमुना नं. ६ इत्यादी उतारे यापुढे केडीसीसी बँकेतच मिळणार आहेत. यामुळे सरकारी विलंब व चकरा मारण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार असून त्यांना तात्काळ कर्ज मिळणे सोपे झाले आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय जाहीर केला. विकास सेवा संस्थांच्या कर्जदार सभासद शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यांचे वितरण करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक -भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. शेतकऱ्यांना शाखा पातळीवर डिजिटल स्वाक्षरीत अधिकार अभिलेख, ७/१२ व ८ अ उतारे तसेच नमुना नंबर सहा इत्यादी उतारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रति उतारे पंधरा रुपये शासनाकडे जमा करावयाचे असून याकरीता मनुष्यबळ, नेटवर्किंग, संगणक व स्टेशनरीसाठी येणारा सर्व खर्च बँक स्वभांडवलातून उचलणार आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा