![]() |
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे |
कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ,करवीर व हातकणंगले या तीन तालुक्यात १५ जून पर्यंत कडक लॉकडाउनची अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या शिरोळ,करवीर व हातकणंगले या तीन तालुक्यातील काही गावे कोरोना हॉटस्पॉट केंद्रे बनली आहेत. यापैकी शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर,उदगाव व शिरोळ ही गावे कोरोना हॉटस्पॉट केंद्र बनली आहेत. तसेच हातकणंगले व करवीर तालुक्यात ही अशीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या तिन्ही तालुक्यातील संबंधित गावे कोरोनामुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कडक अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस प्रशासनाला या तिन्ही तालुक्याच्या गावांमधील नागरिकांच्या वर व शासनाने परवानगी दिलेल्या आस्थापना सोडून इतर आस्थापनेवर करडी नजर ठेवून कडक बंदोबस्त व अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करीत जयसिंगपूरात एका आस्थापनेला दंड करण्यात आला असून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या नेतृत्वाखाली कडक व काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे.
प्रशासनाला सहकार्य करणं हे नागरिकांच्या दृष्टीने फायदेशीर आहे
उत्तर द्याहटवाHou
उत्तर द्याहटवा