कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी पदवी व पदव्युत्तर विविध शाखांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तदनुसार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २३ जुलै,२०२१ ही आहे.
👉🏼 जुलै महिन्याच्या शेवटच्या किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातील कोर्स निहाय सविस्तर माहिती शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर सादर करण्यात येईल.
👉🏼 एम.ए.Distance Mode( दूरशिक्षण) च्या प्रवेश परीक्षेचा निर्णय हा शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर दर्शविला जाईल.आवश्यकतेनुसार
👉🏼 अधिक माहितीसाठी : शिवाजी विद्यापीठाच्या 'www.unishivaji.ac.in/2021' या वेबसाईटच्या लिंक वर जाऊन अधिक माहिती प्राप्त करावी. सदर कोर्स प्रत्यक्षपणे ७/७/२०२१ च्या पुढे विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
सदर माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा