मालोजीराव माने / कार्यकारी संपादक :
आळते येथील रामलिंग तीर्थक्षेत्र परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर पोलिसांनी धडक कारवाई करीत त्यांची वाहने जप्त केले.
सध्या लॉकडाऊन मध्ये कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी खडक असलेल्या निर्बंधामध्ये काही अंशी सूट दिली होती. मात्र कोरोना बाधितांची संख्या अजूनही आटोक्यात न आल्यामुळे शनिवार व रविवार या दिवशी कडक विकेंड लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असताना देखील तिर्थक्षेत्र परिसरात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदार पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या अनुषंगाने आज हातकणंगले पोलिस ठाण्याच्या वतीने लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करीत त्यांची वाहने जप्त करून त्यांना चांगलीच समज दिली.
कोरोना महामारी संपली असल्याच्या अविर्भावात काही पर्यटक वावरत व नियम धाब्यावर बसवत पर्यटनाचा आनंद घेताना दिसत होते. पोलिसाच्या आजच्या कारवाईत ४ चारचाकी व १७ दुचाकी वाहने जप्त करीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली.
या धडक व कडक कारवाईत हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी अतुल निकम,भूषण शेटे,सागर पवार व संग्राम पाटील यांनी या पर्यटकांवर कारवाई करीत सहभाग घेतला.
त्यांच्या या कारवाईने निश्चितपणे कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी फायदा होईल. त्यांच्या या प्रामाणिक कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा